आर्थिक दुर्बल कुटुंबातील आकस्मित आजारपणात मदतीचा हात.
मानवी शरीर आरोग्यपुर्ण असेल तर स्वत:करीता व आपल्या कुटुंबियांकरिता हवे ते श्रम घेऊ शकते. आपल्या कुटुंबाचा भार सहजपणे वाहू शकते. आपल्या भविष्याच्या योजना आखू शकते. पण या सर्व स्वप्नांवर पाणी पडते ते आरोग्याच्या प्रश्नामुळे. कुटुंबातील कर्ता माणूस किंवा कोणताही सदस्य दुर्देवाने मोठ्या आजारात सापडला तर साऱ्या कुटुंबाची आर्थिक घडीच विस्कटते. आपल्या देशात अशी हजारो कुटुंबे आहेत जी अशा एखाद्या आघाताने दारिद्यात फेकली गेली. अनेकदा आजाराचे स्वरुप सुरुवातीला फारसे गंभीर नसते पण पैशाअभावी दुर्लक्ष केल्यामुळे पुढे ते गंभीर होते. त्याचा खर्च त्या कुटुंबाला झेपत नाही. त्यावेळी तिच्या उपचारावरील खर्चामुळे साऱ्या कुटुंबाची आर्थिक स्थिती नाजुक होते. असा अपघात किंवा गंभीर आजार या कुटुंबावर एवढा आर्थिक भार टाकतात कि त्यातून पुन्हा उभारी घेणे फार अवघड होऊन बसते.अशावेळेस त्या कुटुंबाला योग्य आर्थिक मदत मिळाली तर या संकटातून बाहेर पडणे शक्य होऊ शकते.
अशावेळेस त्या कुटुंबाला योग्य आर्थिक मदत मिळाली तर या संकटातून बाहेर पडणे शक्य होऊ शकते. आजच्या परिस्थितीत या कुटुंबाला मदतीसाठी अनेक ठिकाणी धावाधाव करावी लागते. त्यामध्ये त्यांचा बराचसा वेळ व पैसा खर्च होतो. याउलट समाजातील अनेक लोक अशा लोकांना मदतीसाठी उत्सुक असतात. परंतू त्यांना मदत द्यावी कोठे आणि कोणाला हे कळत नाही. यासाठी या दोन्ही घटकांना एकत्रित आणून रुग्णांना आर्थिक मदत पोचविण्यासाठी सदरची वेबसाईट काम करेल
यामध्ये पेशंट किंवा त्याचे नातेवाईक पेशंटची माहिती भरतील. या माहितीत त्यांचा पत्ता, संपर्कनंबर, आजाराचे स्वरूप ही माहिती भरली जात आहे.
मदत करू इच्छिणारे (बॅकर्स) त्यांची माहिती भरतील. बॅकर्स त्यांना विशिष्ठ आजारासाठी किंवा विशिष्ठ परिसरातील आजारी व्यक्तींना मदत करायची आहे, त्याचा तपशील (प्रेफरंन्स) भरतील.
ज्यावेळी पेशंटने भरलेली माहिती या प्रेफरंन्सप्रमाणे असेल त्यावेळी संबंधित बॅकर्सना एसएमएसव्दारे संदेश पाठवला जाईल. हा संदेश मिळाल्यानंतर बॅकर्स संबंधित पेशंटला मदत करण्याबाबत निर्णय घेऊ शकेल.
या पद्धतीने पेशंट आणि बॅकर्स यांच्यामधील दुवा म्हणून ही वेबसाईट काम करेल .